Posts

Showing posts from April, 2024

अलंकार

Image
 अलंकार  अलंकार म्हणजे काय ? अलंकार म्हणजे दागिना , ज्याप्रकारे मनुष्याला सुंदर देखणे दिसण्यासाठी दागिन्याची किंवा चांगल्या कपड्यांची गरज असते त्याप्रमाणे भाषेला सुद्धा शोभा आणण्यासाठी आपण भाषेचे जे काही गुणधर्म वापरतो त्यास  ‘अलंकार’  असे म्हणतात.  कधी दोन गोष्टीतील साम्य दाखवून कधी विरोध दाखवून कधी नाद निर्मिती करून तर कधी शब्दांमध्ये विस्तार करून तर कधी कधी एखाद्या कल्पनेला विस्तारून अक्षररचनेत निर्माण होणाऱ्या नादामुळे भाषेला शोभा येते म्हणजेच आपण भाषेला अलंकार चढवतो. भाषेला शोभा आणण्यासाठी आपण जे काही भाषेचे गुणधर्म वापरतो त्या गुणधर्मामुळे अलंकाराचे २ प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे १. शब्दालंकार २. अर्थालंकार १. शब्दालंकार ज्या विशिष्ट शब्दरचनेमुळे गद्याला किंवा पद्या‌‌ला सौंदर्य प्राप्त होते  त्यास  ‘शब्दालंकार’  असे म्हणतात शब्दालंकारचे आणखी ३ उपप्रकार पंडतात ते पुढीलप्रमाणे (i) अनुप्रास अलंकार जेंव्हा गद्यामध्ये किवा पद्यामध्ये एकाच शब्दाची किंवा अक्षरांची पुनरावृत्ती करून वाक्याला सौंदर्य प्राप्त होते त्यास  ‘अनुप्रास अलंकार’  अस...